नवी दिल्ली : जी-२०च्या (g-20) यशस्वी आयोजनानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) थोड्या वेळात भाजपच्या कार्यालयात पोहोचतील. येथे पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा त्यांचे स्वागत करतील. पंतप्रधान मोदी यांच्याआधी अमित शाह पार्टी कार्यालयात पोहोचले. या दरम्यान अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारही उपस्थित असतील. जी-२०च्या यशानंतर पंतप्रधान मोदींना देशभरातून तसेच जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबरला यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, सौदी अरेबिया, अर्जेंटिनासह जगातील शक्तिशाली देश यात सामील झाले होते. जी-२०मध्ये नवी दिल्ली घोषणा पत्रावर संमती झाली. याला भारतासाठी ऐतिहासिक क्षण म्हटले जात आहे. जी-२०च्या यशानंतर पंतप्रधान यांना जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
तर पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र मंत्रालयाच्या टीमची भेट घेत जी-२०मध्ये त्यांची मेहनत तसेच कठोर परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच यशस्वी आयोजनाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. पंतप्रधान मोदी मंगळवारी अचानक जी-२० सचिवालयात पोहोचले होते. पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्ययांसोबत वैयक्तिकपणे बातचीत केली होती. त्यांच्याकडून अनुभव जाणून घेतले. या दरम्यान पंतप्रधान मोदींसोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते.