मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक्स (ट्विटर) अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. एक्सचे नियम न पाळल्याचा ठपका ठेवत हे अकाऊंट निलंबित केले आहे. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून या अकाऊंटबाबत तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला शरद पवार गटाने धक्का दिल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार यांच्या गटाने त्यांची भूमिका मांडण्यासाठी नवीन एक्स अकाऊंट सुरु केले होते. यावरुन कार्यक्रमांची, दौऱ्यांची माहिती, सभा आणि पत्रकार परिषदेतील मुद्दे, व्हिडीओ, फोटो या देण्यात येत होते. व्हेरिफाईड अकाऊंट आणि १७६८ फॉलोअर्स झाले होते. शरद पवार गटावर अनेकदा टीकाही करण्यात आली होती.