Monday, March 17, 2025
Homeक्रीडाKuldeep Yadav: कुलदीप यादवने दिग्गज क्रिकेटर्सना टाकले मागे, रचला इतिहास

Kuldeep Yadav: कुलदीप यादवने दिग्गज क्रिकेटर्सना टाकले मागे, रचला इतिहास

कोलंबो: भारताचा लेफ्ट आर्म स्पिनर कुलदीप यादवने(kuldeep yadav) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट मिळवत भारताला ४१ धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यात चार विकेट घेत कुलदीप यादवने इतिहास रचला. कुलदीप यादव सगळ्यात कमी सामन्यांमध्ये १५० विकेट मिळवणारा जगातील पहिला लेफ्ट आर्म स्पिनर बनला आहे. इतकंच नव्हे तर कुलदीप यादव भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी सामन्यात १५० विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

आशिया चषकात शानदार फॉर्म काय राखताना कुलदीप यादवने २ सामन्यात ९ विकेट मिळवल्या. कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट मिळवल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धही त्याने आपल्या गोलंदाजीत चांगली कामगिरी करत ९.३ ओव्हरमध्ये ४३ धावा देत ४ विकेट घेतल्या.

कुलदीपने जगभरातील दिग्गजांना टाकले मागे

कुलदीप यादवच्या आधी हा रेकॉर्ड बांगलादेशचा स्पिनर अब्दुल रज्जाकच्या नावावर होता. रज्जाकने १०८ सामन्यांत १५० विकेट मिळवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या ब्रेड हॉजने ११८ सामन्यांत ही कामगिरी केली होती. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ११९ सामन्यात १५० विकेट घेतल्या होत्या. भारताच्या रवींद्र जडेडाला १५० विकेट घेण्यासाठी १२९ सामने खेळावे लागले होते. या सगळ्या दिग्गजांना मागे टाकत कुलदीपने पहिले स्थान मिळवले आहे.

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान १५० विकेट मिळवण्याचा रेकॉर्ड मोहम्मद शमीच्या नावावर आहे. शमीने ८० वनडे सामन्यात १५० विकेट मिळवल्या होत्या. कुलदीप यादवने ८८व्या सामन्यात आपले १५० विकेट पूर्ण केले. या पद्धतीने कुलदीप यादव भारताकडून सगळ्यात कमी सामन्यांत १५० विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -