
मुंबई: सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांच्याविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुंबईच्या मीरारोड पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये विविध समूहांमध्ये तिरस्काराची भावना निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ए आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कल २९५ए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे स्टालिन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे याच्या नावाचाही समावेश आहे.
उदयनिधी यांच्या विधानाचे समर्थन करण्याच्या आरोपात प्रियांक खरगेचे नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यात आले. याशिवाय या प्रकरणात बिहारच्या मुझ्झफरपूर चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टातही उदयनिधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
काय केले होते विधान?
उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. २ सप्टेंबरला झालेल्या संमेलनात ते म्हणाले होते की सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध केला जाऊ शकत नाही, त्यांना संपवलेच पाहिलेच पाहिजे. आम्ही डेंग्यू,मलेरिया, मच्छरला विरोधात नाही करू शकत तो संपवलाच पाहिजे.
उदयनिधी यांच्या विधानावरून देशात वाद सुरू झाला होता. केंद्रीय मंत्र्यांपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांनी याचा विरोध केला होता.