Saturday, July 6, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023: खूपच धोकादायक आहे हा श्रीलंकेचा २० वर्षाचा स्पिनर, भारताचा...

Asia Cup 2023: खूपच धोकादायक आहे हा श्रीलंकेचा २० वर्षाचा स्पिनर, भारताचा अर्धा संघ धाडला तंबूत

कोलंबो: श्रीलंकेचा २० वर्षाचा घातक स्पिनर दुनिथ वेलालगेने टीम इंडियाविरुद्ध मंगळवारी आशिया चषक २०२३ (asia cup 2023) मधील सुपर ४ सामन्यात आपल्या घातक गोलंदाजीने कहर केला. दुनिथ वेलालगने एकट्यानेच भारताच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडले.

श्रीलंकेचा २० वर्षीय घातक स्पिनर दुनिथ वेलागलेने कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियमच्या पिचवर शुभमन गिल(१९), रोहित शर्मा(५३), विराट कोहली(३), केएल राहुल(३९) आणि हार्दिक पांड्या(५) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अतिशय धोकादायक आहे हा क्रिकेटर

श्रीलंकेचा २० वर्षीय घातक गोलंदाज दुनिथ वेलालगेने १४ जून २०२२ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पल्लेकल येथे आपले एकदिवसीय पदार्पण केले होते. दुनिथ वेलालगेने आतापर्यंत १३ एकदिवसीय सामन्यांत १८ विकेट घेतल्या आहेत. दुनिथ वेलालगेचा जन्म ९ जानेवारी २००३ला कोलंबोमध्ये झाला होता. श्रीलंकेसाठी डोमेस्टिकस्तरावर या गोलंदाजाने एकूण १२६ विकेट मिळवल्या आहेत. २०२२च्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये दुनिथ वेलालगेने स्पर्धेतील सर्वाधिक १७ विकेट मिळवल्या होत्या.

का आहे धोकादायक?

दुनिथ वेलालगे एक आर्म लेग स्पिनर आहे आणि सध्याच्या वेळेस तो केवळ २० वर्षांचा आहे. दुनिथ वेलालगेने आपल्या छोट्याशा करिअरमध्ये सिद्ध केले आहे की तो इतका धोकादायक का आहे. दुनिथ वेलालगेने श्रीलंकेसाठी आतापर्यंत १ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -