IND vs PAK: पाकिस्तानला हरवल्यानंतर रोहितकडून खेळाडूंचे कौतुक

कोलंबो: टीम इंडियाने (team india) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला(pakistan) २२८ धावांनी हरवले. भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत १२८ धावांवर आटोपला. धावांच्या हिशोबाने पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सगळ्यात मोठा विजय आहे.


या सामन्यात टीम इंडियाकडून विराट कोहली आणि के एल राहुल यांनी शानदार शतके ठोकली. या मोठ्या विजयानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंचे जोरदार कौतुक केले.



कर्णधार रोहितने खेळाडूंचे कौतुक केले


कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटले, आम्हाला फक्त काही वेळासाठी मैदानात जायचे होते. मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर हे शक्य झाले. मला माहित आहे की संपूर्ण मैदान झाकणे आणि कव्हर हटवणे किती कठीण आहे. संपूर्ण संघाकडून आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतो.


फलंदाजीबाबत बोलताना रोहित म्हणाला, आम्हाला माहीत होते की विकेट चांगली आहे आणि आम्हाला पावसासोबत ताळमेळ बसवावा लागेल. विराट कोहली आणि लोकेश राहुलला पकड मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि आम्ही त्यानंतर पुढे जाऊ शकतो.



बुमराहच्या पुनरागमनाबाबत


वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली. रोहित म्हणाला, बुमराह चांगला वाटत आहे. त्याने बॉल दोन्ही बाजूनी फिरवला गेल्या ८-१० महिन्यांत त्याने कठोर मेहनत घेतली. बुमराह केवळ २९ वर्षांचा आहे त्याने सामना सोडणे आदर्श नाही मात्र तो ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावरून समजते की तो काय करत आहे.


विराटने छान खेळई केली. आणि केएल राहुल दुखापतीतून परतल्यानंतर आणि टॉसच्या ५ मिनिटे आधी खेळण्यास आम्ही त्याला तयार होण्यास सांगितले. ही खेळाडूची मानसिकता दर्शवते.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना