कोलंबो: आशिया चषकातील सुपर ४ मध्ये (asia cup 2023) आज भारताचा(india) सामना श्रीलंकेशी(srilanka) होत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून खेळवला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हाती असणार आहे तर दासुन शनाका श्रीलंका संघाचे नेतृत्व करेल.
भारतीय संघाने सुपर ४मध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला २२८ धावांनी हरवले. तर श्रीलंकाने बांगलादेशला सुपर ४मधील पहिल्या सामन्यात २१ धावांनी हरवले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ते फायनलमध्ये पोहोचतील.
भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्यात खराब वातावरणामुळे फरक पडू शकतो. AccuWeather.comच्या अनुसार आज संपूर्ण दिवस कोलंबोमध्ये ढग राहतील. तर मध्ये मध्ये पाऊस पडू शकतो. संपूर्ण दिवस काळे ढग राहण्याची शक्यता ९५ टक्के आहे आणि पावसाची शक्यता ८४ टक्के आहे. दरम्यान दिवस संपण्यासह पावसाची शक्यता ५५ टक्के असू शकते.
कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियमच्या पिचवर सुरूवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. जर वेगवान गोलंदाज नव्या बॉलने चांगल्या लाईनवर गोलंदाजी करतात तर फलंदाजांना त्रासदायक ठरू शकते. एखादा फलंदाज पिचवर सेट झाला तर तो मोठी खेळी करू शकतो. विराट कोहली आणि के एल राहुलने पाकिस्तानविरुद्ध अशीच कमाल केली होती.
असा आहे भारत वि श्रीलंका रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात १६५ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले. त्यापैकी ९६ सामन्यात भारताने तर ५७ सामन्यांत श्रीलंकेने विजय मिळवला आहे. तर ११ सामन्यांमध्ये निर्णय झाला नाही.