Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Fire: भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, जिवितहानी नाही

Fire: भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, जिवितहानी नाही

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दालमिल कंपाऊंडमध्ये केमिकलच्या गोदामला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी घडली. या दुर्घटनेत गोदामात साठवलेला केमिकल साठा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे.


अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.मात्र गोदामातील केमिकल ज्वलनशील असल्याने आगेवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून आगीचे नेमके कारण अजूनही समजले नाही.


विशेष म्हणजे या परिसरात अवैद्य केमिकल साठे मोठ्या प्रमाणात असतानाही स्थानिक पोलीस प्रशासना बरोबरच ग्रामपंचायत व महसूल विभागाचे या अनधिकृत केमिकल साठ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Comments
Add Comment