Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

Earthquake: मणिपूरमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

Earthquake: मणिपूरमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

इंफाळ: मणिपूरमध्ये (manipur) सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के(earthquake) जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्रबिंदू राज्यातील उखरूलपासून ६६ किमी दूर होते.

एनसीएसच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप सोमवारी रात्री ११ वाजून एक मिनिट आणि ४९ सेकंदाला झाला होता.

अंदमान समुद्रातही भूकंप

याशिवाय मंगळवारी सकाळी तीन वाजून ३९ मिनिटांनी अंदमानाच्या समुद्रातही भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता ४.४ मॅग्निट्यूड इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत ९३ किमी खोल होते.

मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक मृत्यू

गेल्या शुक्रवारी आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात दोन हजारापेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. याशिवाय अनेक जण जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भूकंपाचे झटके कासाब्लांकापासून ते मराकेश या देशाच्या विविध भागांत जाणवले. या भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा