Virat Kohli: किंग कोहलीने रचला इतिहास, मोडला सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Share

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) सुपर ४ फेरीत भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी(india vs pakistan) होत आहे. कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीचा जलवा पाहायला मिळाला. कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील ७७वी तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमधील ४७वे शतके ठोकले.कोहलीने ९४ बॉलमध्ये नाबाद १२२ धावा केल्या यात ९ चौकार आणि तीन षटकार ठोकले.

या खेळीदरम्यान कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १३ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने याबाबतीत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. सचिन तेंडुलकरने ३२१ डावांमध्ये १३ हजार झावा पूर्ण केल्या होत्या. विराटने हे यश केवळ २६७ डावांमध्ये मिळवले आहे.

सचिनने पाकिस्तानविरुद्ध पूर्ण केल्या होत्या १३ हजार धावा

योगायोगाची बाब म्हणजे क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही १३ हजार धावा पाकिस्तानविरुद्ध पूर्ण केल्या होत्या. त्याने १६ मार्च २००४मध्ये रावळपिंडी येथे ३३० सामन्यातील ३२१ डावांत हे केले होते. त्या सामन्यात सचिनने १४१ धावांची दिमाखदार खेळी केली होती. याच्या जोरावर भारताने पाकिस्तानला १२ धावांनी हरवले होते.

आता विराटनेही आपला आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकप्रमाणेच या सामन्यात शतक ठोकत १३ हजार धावा पूर्ण केल्या तेही पाकिस्तानविरुद्ध. कोहली, सचिनशिवाय रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारानही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय १३ हजार धावा केल्या होत्या.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १३ हजार धावा

विराट कोहली – २६७ डाव, कोलंबो २०२३
सचिन तेंडुलकर – ३२१ डाव, रावळपिंडी २००४
रिकी पाँटिंग – ३४१ डाव, ओव्हल २०१०
कुमार संगकारा – ३६३ डाव, हम्बनटोटा २०१४
सनथ जयसूर्या – ४१६ डाव, दाम्बुला २००९

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

12 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

50 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago