Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Dharmendra: धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी वडिलांना घेऊन सनी देओल अमेरिकेत

Dharmendra: धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी वडिलांना घेऊन सनी देओल अमेरिकेत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल(sunny deol) सध्या आपला सिनेमा गदर २ (gadar 2) मुळे सातत्याने चर्चेत आहे. या सिनेमाने आतापर्यंत ५१० कोटींहून अधिक रूपयांची कमाई केली आहे. एकीकडे सिनेमाच्या कलेक्शनबद्दल सेलिब्रेशन सुरू असताना त्यांचे वडील धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली आहे.


मीडिया बातम्यांनुसार अभिनेता आपले वडील धर्मेंद्र यांच्या उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेले आहेत. सनी देओल आपल्या वडिलांसोबत २० दिवस अमेरिकेत राहणार आहेत. धर्मेंद्र यांना काही ना काही आरोग्यासंबंधित तक्रारी सतावत असतात. तेथे त्यांच्यावर १५ ते २० दिवस उपचार सुरू राहणार आहे. दरम्यान, याबाबत घाबरण्याचे काही कारण नसून सर्व काही ठीक असल्याचे म्हटले आहे.



रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये दिसले होते धर्मेंद्र


धर्मेंद्र नुकतेच करण जोहरचा सिनेमा रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात दिसले होते. सिनेमात ते शबाना आझमीसोबत रोमान्स करताना दिसले होते. सिनेमातील दोघांच्या किसिंग सीनने खळबळ उडवून दिली होती. सिनेमात धर्मेंद्र यांनी रणवीर सिंह यांच्या आजोबांची भूमिका बजावली होती.



सनी देओल करिअर


बॉलिवूड अभिनेता सनी देओल नुकताच आलेला सिनेमा गदर २मध्ये दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सिनेमातील त्यांचे तारा सिंह या भूमिकेला पसंती मिळाली होती.

Comments
Add Comment