Tuesday, May 13, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Jawan: जवान सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर हंगामा, ३ दिवसांत केली इतकी कमाई की...

Jawan: जवान सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर हंगामा, ३ दिवसांत केली इतकी कमाई की...

मुंबई: यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये आलेल्या पठाण (pathan) सिनेमाद्वारे तब्बल ४ वर्षांनी शाहरूख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. त्याचा स्पाय अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर आता ८ महिन्यांनी शाहरूखचा नवा सिनेमा जवान (jawan) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हंगामा उडवत आहे.


जवान सिनेमात शाहरूखचा असा अवतार पाहायला मिळत आहे जो आधी कधीच पाहिला नव्हता. शाहरूखची अॅक्शन, त्याचा लूक आणि स्वॅग याची मोठी क्रेझ थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे वीकेंडला जवानचे तिकीट मिळणे मुश्किल झाले आहे.


गुरूवारी थिएटरमध्ये रिलीज झालेला जवान हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासात सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला. शुक्रवारी कामकाजाचा दिवस असल्याने सिनेमाने थोडी कमी कमाई केली. मात्र शनिवारी पुन्हा एकदा कमाईने उसळी घेतली.



शनिवारी बॉक्स ऑफिसवर जवानचा डंका


पहिल्या दिवशी ७५ कोटी रूपये कमावणाऱ्या जवानच्या कमाईत शुक्रवारी घट झाली. या दिवशी त्याचे नेट कलेक्शन भारतात ५३ कोटी इतके होते. मात्र शनिवारी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अशी उसळई घेतली की तिसऱ्या दिवशीची कमाई आणि पहिल्या दिवशीची कमाई सारखीच झाली. तिसऱ्या दिवशी जवानने देशभरात ७३ ते ७५ कोटींची कमाई केली. म्हणजेच तीन दिवसांत शाहरूखच्या जवान सिनेमाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.



वेगवान २०० कोटींची कमाई


जानेवारी शाहरूखच्या पठाण सिनेमाने ४ दिवसांत २०० कोटींचा आकडा पार केला होता. आता जवानने पठाणलाही मागे टाकले आहे. जवानने तीन दिवसांत २०० कोटींचा आकडा पार केला आहे.


Comments
Add Comment