
कोलंबो: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील आशिया चषक २०२३मधील (asia cup 2023) सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
विराट कोहली आणि के एल राहुल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने ३५६ धावांची खेळी केली. राहुलने आपले सहावे आणि कोहलीने ४७वे वनडे शतक ठोकले. राहुलने १०६ चेंडूत १११ आणि कोहलीने ९४ बॉलमध्ये १२२ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी १९४ चेंडूत २३३ धावांची भागीदारी केली.
याआधी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात केवळ २४.१ षटकांचा खेळ झाला होता. पावसाने सामन्यात खोडा घातल्याने पुढील सामना होऊ शकला नव्हता. पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली होती. रोहितने ४९ चेंडूत जबरदस्त ५६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. तर शुभमन गिलने ५२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर २ बाद १४७ धावांवरून आज खेळ सुरू झाला. विराट कोहली आणि लोकेश राहुलने या सामन्यात दमदार कामगिरी केली. या दोघांनी शतके ठोकत भारताला साडेतीनशे पार धावसंख्या उभारून दिली.