कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) सातत्याने भारत(india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील सामन्यात पावसाचाच खेळ सुरू आहे. या स्पर्धेतील संघांदरम्यानचा दुसरा सामना रविवारी खेळवण्यात आला. मात्र पावसाने या सामन्यात खोडा घातल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आज म्हणजेच सोमवारी राखीव दिवशी हा सामना होमार आहे.
टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात २४.१ षटकांचाच खेळ करता आला. त्यानंतर पाऊस थांबण्याचे नावच घेईना अखेर हा सामना थांबवण्यात आला. मुसळधार पावसामुळे रविवारी सामना पूर्ण होऊ शकला नाही. आशिया चषक २०२३च्या फायनल आणि भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला. आता हा सामना आज म्हणजेच सोमवारी ११ सप्टेंबरला होईल.
भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २४.१ षटकांत १४७ धावा केल्या होत्या. आता राखीव दिवशी याच धावसंख्येवरून पुढील सामना सुरू होईल. मात्र सोमवारीही कोलंबोचे हवामान चांगले दिसत नाही आहे.
कोलंबोमध्ये सोमवारी पावाची ९९ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच सामना रंगण्याची कोणतीही आशा नाही. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ९५ टक्के आहे. हवेचा वेगही ४१ किमी/प्रति तास राहील.
राखीव दिवशी पाऊस आला तर काय?
राखीव दिवशी भारताच्या २ बाद १४७ वरून डाव सुरू होईल. मात्र तेथील हवामान पाहता चाहत्यांच्या मनात सवाल येत आहे की जर राखीव दिवशी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल? याचे उत्तर आहे की जर राखीव दिवशी सामना झाला नाही तर तो रद्द करण्यात येईल. अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एकएक गुण दिला जाईल.
नियमानुसार एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये निकालासाठी दोन्ही डावांत कमीत कमी २०-२० षटकांचा खेळ होणे गरजेचे असते. जर राखीव दिवशी पाऊस आला तर पाकिस्तानला कमीत कमी २० षटकांचा खेळ करावा लागेल. पाकिस्तानचा संघ २० षटकेही खेळू शकला नाही तर सामना रद्द होईल.