Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

G-20 Summit : पंतप्रधान मोदींनी जग जिंकले, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

G-20 Summit : पंतप्रधान मोदींनी जग जिंकले, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई: भारताची राजधानी नवी दिल्लीत नुकतीच जी-२० शिखर परिषद(g-20 summit) अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या परिषदेसाठी जगभरातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताने या परिषदेचे यशस्वीपणे यजमानपद सांभाळले.

दोन दिवसांच्या या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावरील नेत्यांनी चर्चा केली. तसेच या परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष एकत्र आले होते. याद्वारे पंतप्रधान मोदींनी जग जिंकले असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच नवी दिल्लीतील या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

 

तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास वेगाने होत असून अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचा अनुभव परिषदेत आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >