Monday, October 27, 2025
Happy Diwali

Canada: विमानातील तांत्रिक बिघाडामुळे भारतातच अडकले कॅनडाचे पंतप्रधान

Canada: विमानातील तांत्रिक बिघाडामुळे भारतातच अडकले कॅनडाचे पंतप्रधान

नवी दिल्ली : नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेत (g-20 summit) सहभागी होण्यासाठी भारतात आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (justin trudeau) यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे त्यांना भारतातच थांबावे लागले. तर कॅनडाच्या इंग्रजी वृत्तपत्रानुसार भारतात अडकलेले पंतप्रधान ट्रुडो आणि कॅनडाचे प्रतिनिधीमंडळ यांना घेण्यासाठी बॅकअप विमान येत आहे.

रिपोर्टनुसार, कॅनडाचे एक पोलारिस विमान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि कॅनडाचे जी-२० प्रतिनिधीमंडळाला घेण्यासाठी भारतात येत आहे.

कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, एक बॅकअप एअरबस जस्टिन ट्रुडो आणि प्रतिनिधीमंडळाला परत आणण्यासाठी CFC002 ट्रेंटन येथून भारतासाठी रवाना झाले आहे. रविवारी रात्री ८ वाजता हे विमान ट्रेंटन येथून रवाना झाले. सोमवारी इंग्लंडमध्ये थांबले. हे एअरबस भारतात येत आहे.

पंतप्रधान ट्रुडोचे प्रेस सचिव मोहम्मद हुसैन यांनी एका विधानात म्हटले की आम्ही उद्या सकाळी प्रस्थानासाठी काम करत आहोत. मात्र परिस्थिती अद्याप अस्थिर आहे.

रात्रभरात ठीक नाही झाले विमान

जी-२० शिखर परिषद संपल्यानंतर जस्टिन ट्रुडो रविवारी नवी दिल्ली येथून निघणार होते. मात्र उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे कॅनडाच्या सशस्त्र दलाने हे विमान रोखले. रात्रभरात हे विमान ठीक झाले नाही.

पंतप्रधान मोदींसोबत घेतली होती भेट

याआधी रविवारी संध्याकाळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मोदींसोबत द्विपक्षीय बैठक केली होती. जस्टिन ट्रुडो ८ सप्टेंबरला दिल्लीत पोहोचले होते.

Comments
Add Comment