Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीChandrababu Naidu: भ्रष्टाचार प्रकरणात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Chandrababu Naidu: भ्रष्टाचार प्रकरणात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंध्र प्रदेशातील ३७१ कोटींच्या कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणार गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ही अटक केली. माजी मुख्यमंत्री नायडू यांना १४ दिवस राजमुंदरी सेंट्रल जेलमध्ये ठेवले जाईल. हे पाहता तुरुंगाजवळ कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

नायडू यांना शनिवारी रात्री उशिरा तीन वाजून ४० मिनिटांनी मेडिकल तपासणीसाठी विजयवाडाच्या सरकारी जनरल रुग्णालयात नेण्यात आले होते. याआधी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली.

एन चंद्राबाबू नायडू यांना कधी केली अटक?

सीआयडीच्या टीमे माजी केंद्रीय मंत्री नायडू यांना शनिवारी सकाळी सहा वाजता नंदयाल शहराच्या ज्ञानपुरम येथील आर के फंक्शन हॉलच्या बाहेर अटक करण्यात आली होती. नायडू जेव्हा आपल्या बसमध्ये झोपले होते तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.

टीडीपीने काय म्हटले?

एन चंद्राबाबू नायडूचा पक्ष टीडीपीने याबाबतची सर्व माहिती सोशल मीडियावर देत म्हटले की नायडू यांच्याविरोधात खोट्या केस दाखल करण्यात आले आहेत. लोक त्यांच्यासोबत आहेत.

काय आहे प्रकरण?

२०१४मध्ये आंध्र प्रदेशातील बेरोजगार तरुणांसाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. यात ३७१ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -