
कोलंबो: आशिया चषक २०२३मधील( asia cup 2023) सुपर ४चा तिसरा सामना भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यात खेळवला जात आहे. या स्पर्धेतील या दोन्ही संघादरम्यानचा हा दुसरा सामना आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्ये पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला होता. आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता.
दरम्यान, यावेळेस भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. हा सामना कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी २ बाद १४७ धावा केल्या आहेत. सोमवारी हा सामना पुन्हा याच धावांवरून सुरू होणार आहे. रिझर्व्ह डेच्या दिवशी भारतीय संघ २४.१ षटकाच्या पुढे खेळणार आहे.
#INDvsPAK | India vs Pakistan match in the Asia Cup called off for the day due to rain, to resume tomorrow pic.twitter.com/QA7XsSoyXl
— ANI (@ANI) September 10, 2023
याआधी सामन्यात भारतीय संघाने सलामीला दमदार कामगिरी बजावली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. संघाने १४ षटकांतच १०० धावा पूर्ण केल्या. रोहित ५६ तर शुभमन गिल ५८ धावा करून बाद झाला.
पावसामुळे खेळ थांबला तेव्हा के एल राहुल १७ आणि विराट कोहली ८ धावांवर खेळत आहेत. याआधी पाकिस्तानने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला होता.