Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीAsia cup 2023: सुपर ४मध्ये आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

Asia cup 2023: सुपर ४मध्ये आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) आज दुसऱ्यांदा भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) आमनेसामने येत आहेत. सुपर ४च्या फेरीचा हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळवण्यात येईल. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या सामन्यात फलंदाजांची परीक्षा असेल.

खासकरून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रऊफ आणि नसीम शाह मोठे आव्हान ठरू शकतात. कोहली आणि रोहित नेहमीच शाहीनविरुद्ध खेळताना स्ट्रगल करताना दिसले आहेत.

मात्र कोलंबोची ही पिच आज कोहली आणि रोहितची खरी अग्निपरीक्षा घेतील. खरंत, कोलंबोची ही पिच गोलंदाजांसाठी सहाय्यक ठरू शकते. जर आकाशात काळे ढग असतील तर वेगवान गोलंदाजांसाठी हे सहाय्यकच ठरू शकते. ज्या प्रमाणे कोलंबोचे हवामान आहे त्यानुसार येथे काळे ढग दाटलेले असण्याची शक्यता आहे.

पिच रिपोर्ट

कोलंबोची पिच फलंदाजांसाठी अनुकूल असणार नाही. म्हणजेच एका एका धावेसाठी येथील फलंदाज झुंजताना दिसेल. श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही असे पाहायला मिळाले होते.

दोन्ही संघात वेगवान गोलंदाज

भारत आणि पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाज आहे. पाकिस्तानी संघात शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रऊफ, नसीम शाह आणि फहीम अश्रफसारखे स्टार वेगवान गोलंदाज आहेत. तर भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, याशिवाय मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यापैकी एकाला संधी मिळू शकते. या सामन्यात शार्दूल ठाकूरही खेळताना दिसू शकतो.

भारताविरुद्ध पाकिस्तानचे प्लेईंग ११

बाबर आजम (कर्णधार), फखर जमां, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), शादाब खान (उप-कर्णधार), फहीम अशरफ, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफरीदी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -