कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये भारतीय संघ (indian team) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील महामुकबाल कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. कोलंबोमध्ये मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. पिच कव्हर्सने झाकण्यात आले आहे.
सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने सलामीला दमदार कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि आणि शुभमन गिलने मिळून १२१ धावांची सलामी केली.
रोहित आणि गिलचे अर्धशतक
सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ बॉलमध्ये ५६ धावा केल्या. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. रोहितने ४२ बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. तर शुभमन गिलने ५२ बॉलमध्ये ५८ धावांची खेळी केली.
पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने २ बाद १४७ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा विराट कोहली ८ आणि के एल राहुल १७ धावा करून नाबाद राहिला आहे. आता चाहत्यांच्या मनात सवाल आहे की जर पावसामुळे खेळ झाला नाही तर काय होईल. दुसरे हे की जर पाऊस उशिरापर्यंत राहिला तर पाकिस्तानला किती षटकांमध्ये किती धावा मिळणार आहे.
India vs Pakistan: Cut-off time extended to 90 min, 20 over run chase on cards as well
Read @ANI Story | https://t.co/AhdJFNeRQ5#INDvsPAK #India #Pakistan #AsiaCup2023 #Rain pic.twitter.com/Xy3MirnJTU
— ANI Digital (@ani_digital) September 10, 2023
रिझर्व्ह डेला होऊ शकतो सामना
जर पाऊस थांबला नाही तर सामना पुढील दिवस रिझर्व्ह डेला खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट कौन्सिलने फायनलशिवाय भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक रिझर्व्ह डे ठेवला. अशातच चाहते निराश होण्याची गरज नाही.
जर आज पाऊस थोडा थांबला तर त्या स्थितीत भारताला बॅटिंग दिली जाणार नाही. वेळेनुसार पाऊस थांबला तर २० ते २४ षटकांचा खेळ होऊ शकतो.
सामना झाल्यास पाकिस्तानला किती धावांचे मिळणार आव्हान?
२० षटकांत – १८१ धावांचे आव्हान
२१ षटकांत – १८७ धावांचे आव्हान
२२ षटकांत – १९४ धावांचे आव्हान
२३ षटकांत – २०० धावांचे आव्हान
२४ षटकांत – २०६ धावांचे आव्हान