Sunday, July 7, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलPoems and riddles : बाप्पाची कृपा कविता आणि काव्यकोडी

Poems and riddles : बाप्पाची कृपा कविता आणि काव्यकोडी

बाप्पाची कृपा

बाप्पाच्या स्वागताचा
केवढा हा थाट
बाप्पा घरी येणार म्हणून
सारेच आनंदात

वाजतगाजत घरी
बाप्पा जेव्हा येतो
घरोघरी चैतन्याचे
कारंजे फुलवितो

बाप्पासाठी मखराची
शोभिवंत आरास
समईच्या प्रकाशाने
उजळे सारा निवास

बाप्पाच्या गळ्यात
दुर्वांचा हिरवा हार
जास्वंदाचे फूल
बाप्पाला आवडे फार

बाप्पाच्या आरतीला
आम्हीच होतो भाट
उत्साहाने घर अवघे
भरते काठोकाठ

सत्य सुंदर मांगल्याचा
जो जो घेईल ध्यास
त्याच्यावरी बाप्पाची
कृपा होईल खास.

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) कृष्ण जन्माष्टमीचा
काला खाऊ
उंच दहीहंडी
फोडताना पाहू

नारळी पौर्णिमा
आणि रक्षाबंधन
कोणत्या महिन्यातले
हे सारे सण?

२) लोखंडी पायाने
पळते अफाट
डोंगर पोखरून
चढते घाट
पाहिजे त्याला
हवे तेथे नेते
जंगल नदीही
पार कोण करते?

३) हात पाय छोटे छोटे
केस काळे काळे
छोटीशी वेणी अन्
डोळे निळे निळे
ताईच्या कडेवर
गुपचूप बसे
बाळासोबत खेळताना
कोण बरं हसे?

उत्तर :- 

१) भाद्रपद

२) आगगाडी

३) बाहुली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -