Monday, July 15, 2024
HomeदेशG20 Summit: जी-२० नंतर आता कुठे रवाना होणार जगभरातील नेते

G20 Summit: जी-२० नंतर आता कुठे रवाना होणार जगभरातील नेते

नवी दिल्ली : दिल्लीत दोन दिवसीय जी-२० परिषदेचे (g-20 summit) यशस्वीपणे समापन झाले आहे. पंतप्रधान मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लूला डा सिल्वा यांच्याकडे अध्यक्षता सोपवली गेली. सोबतच संमेलनात सामील झालेले नेते लववकरच आपापल्या देशात रवाना झाले आहेत.

न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकसह अनेक जागतिक नेते दोन दिवसांच्या जी-२० परिषदेत सहभागी झाल्यानंतर सोमवारी दिल्ली सोडत आहेत.

संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, इजिप्त, चीन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अर्जेंटिना, इंडोनेशिया, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, तुर्की, जपान, इटली, स्पेन, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि सिंगापूरसह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीवरून रवाना होतील. याशिवाय ब्राझील, आफ्रिकन संघ, नायजेरिया, सौदी अरेबिया, युरोपीय संघ आणि मॉरिशसचे नेते सोमवारी दिल्लीतून प्रस्थान करतील.

केंद्रीय राज्य मंत्र्यांना जबाबदारी

केंद्र सरकारने शिखर परिषदेनंतर परदेशी प्रतिनिधींना अलविदा करण्यासाठी केंद्रीय राज्य मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

व्हिएतनामसाठी रवाना झाले बायडेन

यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हिएतनामसाठी रवाना झाले आहेत. ते रविवारी तेथे पोहोचतील. बायडेन व्हिएतनामधील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे नेते गुयेन फु ट्रोंह यांच्याशी भेट घेतील.

भारतातच राहणार मोहम्मद बिन सलमान

तर जी-२० परिषदेत सहभाग घेतलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान राजकीय दौऱ्यासाठी सध्या भारतातच थांबतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानुसार ते सोमवारपर्यंत भारतात राहतील. तसेच मोदींसह ते द्विपक्षीय बैठकही करतील.

बांगलादेश जाणार शेख हसीना

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सोमवारी सकाळी १०.२० वाजता दिल्लीतून रवाना होतील. राज्यमंत्री अनुप्रिया पटेल त्यांना निरोप देतील. हसीना भारतातून सरळ बांगलादेशात पोहोचतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -