Morocco Earthquake : मोरोक्कोमधील भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या २००० वर, शेकडो घरे जमीनदोस्त

  203

रबात: मोरक्कोमध्ये (morocco) ८ सप्टेंबरच्या रात्री आलेल्या ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने (earthquake) या देशाला मोठा तडाखा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी गेलेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या भूकंपात आतापर्यंत २०००हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत.मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.


या भूकंपामुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे अनेक लोक बेघर झाले आहे. अल जजिराच्या माहितीनुसार मोरोक्कोमध्ये ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या नैऋत्य दिशेला ७२ किलोमीटर अंतरावर होता. गेल्या १२० वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे.


मोरोक्कोच्या कासाब्लांका आणि राबात या शहरांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अनेक घरे जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी तर अनेक कुटुंबेच्या कुटुंबे मृत्युमुखी पडली.


 


परदेशी नेत्यांकडूनही मोरोक्कोमध्ये झालेल्या जिवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबद्दल शोक व्यक्त केला. मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे खूप दु:खी आहे. या दुख:द काळात माझ्या संवेदना मोरोक्कोतील लोकांसोबत आहेत. जखमीं व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतो. भारत या कठीण काळात मोरोक्कोला हवी ती मदत देण्यास तयार आहे.

Comments
Add Comment

अजित डोभाल यांनी घेतली पुतिन यांची भेट, रशियाचे राष्ट्राध्यक्ष लवकरच भारतभेटीवर

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना वर्षाच्या अखेरीस भारत भेटीसाठी पंतप्रधान मोदींनी केले आमंत्रित मॉस्को: एकीकडे

ट्रम्पनी जाहीर केले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी ४३८ कोटींचे बक्षीस

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी जाहीर केलेल्या बक्षीसाची

ट्रम्प यांची 'बोलती बंद' करणारी धक्कादायक आकडेवारी समोर!

भारतावर आरोप करणारे ट्रम्प स्वतः रशियाशी किती व्यापार करतात? डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका; स्वतः

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या

चीनच्या सैन्यात रोबोटिक लांडग्याचा समावेश, मिनिटाला ६० गोळ्या झाडणार

बीजिंग : चीनच्या सैन्याने आपल्या भात्यात आता लांडग्याच्या रुपातील रोबो आणला आहे. मंगळवारीच चिनी सैन्याने या

Kelley Mack : 'द वॉकिंग डेड' फेम अभिनेत्री केली मॅकचे निधन; वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूड आणि टीव्ही सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केली मॅक (Kelley Mack) हिचं वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी निधन झालं आहे.