रबात: मोरक्कोमध्ये (morocco) ८ सप्टेंबरच्या रात्री आलेल्या ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने (earthquake) या देशाला मोठा तडाखा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी गेलेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या भूकंपात आतापर्यंत २०००हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत.मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या भूकंपामुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे अनेक लोक बेघर झाले आहे. अल जजिराच्या माहितीनुसार मोरोक्कोमध्ये ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या नैऋत्य दिशेला ७२ किलोमीटर अंतरावर होता. गेल्या १२० वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे.
मोरोक्कोच्या कासाब्लांका आणि राबात या शहरांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अनेक घरे जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी तर अनेक कुटुंबेच्या कुटुंबे मृत्युमुखी पडली.
#WATCH | G 20 in India | PM Modi at the G 20 Summit says “Before we start the proceedings of G20, I want to express my condolences over the loss of lives due to an earthquake in Morocco. We pray that all injured recover at the earliest. India is ready to offer all possible… pic.twitter.com/ZTqcg11cKI
— ANI (@ANI) September 9, 2023
परदेशी नेत्यांकडूनही मोरोक्कोमध्ये झालेल्या जिवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबद्दल शोक व्यक्त केला. मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे खूप दु:खी आहे. या दुख:द काळात माझ्या संवेदना मोरोक्कोतील लोकांसोबत आहेत. जखमीं व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतो. भारत या कठीण काळात मोरोक्कोला हवी ती मदत देण्यास तयार आहे.