Tuesday, July 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का?

मुंबई : राज्यात सुरु असलेला मराठा आंदोलनाचा (Maratha Andolan) प्रश्न दिवसेंदिवस जोर धरत आहे. आज सलग बारावा दिवस असूनही मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे उपोषण सुरुच आहे व ते अधिक तीव्र करण्याचा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने दोन दिवसांपूर्वी जीआर काढून मराठा आरक्षणाची मागणी मान्यदेखील केली होती. मात्र, यातील वंशावळ हा शब्द काढून टाकून सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी दाखले देऊन आरक्षण मान्य केले जावे, अशी मागणी जरांगेंनी सरकारपुढे ठेवली आहे. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्या मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असफल ठरत असून बाराव्या दिवशीदेखील ते उपोषणावर ठाम आहेत. मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी देखील अपयशी ठरली. मनोज जरांगेंच्या मागणीवर मुंबईत झालेल्या बैठकीत नवीन जीआर काढण्यात आला मात्र या जीआर मध्ये दुरुस्ती झाली नसल्याने उपोषण सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट, काँग्रेस, मनसे यांच्यासह ठाकरे गटालाही बैठकीच निमंत्रण दिले जाणार आहे.

उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का?

ठाकरे गट व सत्ताधारी शिवसेना यांच्यात चालू असलेल्या पक्ष आणि नावाच्या संघर्षावर येत्या १४ सप्टेंबरपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुनावणी करणार आहेत. एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे हे पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मराठ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार का, हे पाहावं लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -