ठाणे : ठाणे (thane) शहरातील बाळकुम परिसरात ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. येथील लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात ६ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,ठाण्याच्या बाळकुम येथील परिसरातील हायलँड पार्कमध्ये नारायण स्कूलच्या बाजूला असलेल्या रुणवाल गार्डन येथे ही दुर्घटना घडली. नुकत्याच तयार झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे कामगार काम संपवून खाली येत असतानाच ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला.
या लिफ्टचा वापर हे कामगार इमारतीत वर जाण्यासाठी करत होते. याच दरम्यान लिफ्टचा दोर तुटला आणि या दुर्घटनेत या कामगारांना आपला जीव गमवावा लागला.दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाची टीमने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य वेगात सुरू केले आहे. दरम्यान, ही दुर्घटना कशी घडली याचा तपास पोलीस करत आहेत.