
प्रिया बैरागी
निफाड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या बारा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र शासन त्यांच्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नाही. ही बाब गंभीर असून त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील मराठा शेतकरी वाल्मीक गंगाराम बोरगुडे यांनी रविवारपासून सरणावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे निवेदन निफाड पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.
आज गावातील मराठा तरुण घरोघरी जाऊन सरण रचण्यासाठी एक एक लाकूड व एक गौरी गोळा करणार आहेत
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नैताळे येथे सरणावर उपोषण केले जाणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील मराठा तरुणांनी यासाठी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी रविवार, १० सप्टेबर रोजी सकाळी ८-०० वाजता नैताळे ग्रामपंचायत समोर उपस्थित रहावे, असे आवाहन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे यांनी केले आहे.