Friday, February 14, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईला पाणी पुरवठा करणारे चार तलाव ओव्हरफ्लो

मुंबईला पाणी पुरवठा करणारे चार तलाव ओव्हरफ्लो

पालघर जिल्ह्यातील सर्व धरणं फुल्ल

मुंबई : मागील दोन दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी चार धरणे फुल्ल झाली आहेत.

मुंबईतील सातही तलावात ९६.२० टक्के जलसाठा आहे. मुंबईतील चार तलाव शंभर टक्के भरली आहेत. तुलसी, विहार, तानसा आणि मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झाले. तानसा आणि मोडकसागर मधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागच्यावर्षी याचवेळी मुंबईतील सातही तलावात ९८.१७ टक्के जलसाठा शिल्लक होता.

मोडकसागर, तानसा, विहार आणि तुलसी मध्ये शंभर टक्के जलसाठा आहे. तर अप्पर वैतरणामध्ये ८७.१३ टक्के पाणीसाठा असून मध्य वैतरणा ९७.६१ टक्के जलसाठा आणि भातसात ९७.०५ टक्के जलसाठा आहे.

तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे. पावसाच्या पुनरागमनाने संकटात सापडलेल्या शेतीला जीवनदान मिळाले असून प्रमुख धरणांमध्ये एकूण ४०० दलघमी इतका मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने वर्षभर पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न देखील सुटला आहे. ऐन वेळेत पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

पालघर जिल्ह्यात सूर्या मोठा प्रकल्प अंतर्गत धामणी आणि कवडास उन्नेयी बंधारा ही दोन प्रमुख धरणे आहेत. या धरणांमधून डहाणू नगरपरीषद, तारापूर अणूऊर्जा प्रकल्प, बीएआरसी, तारापूर औद्योगिक वसाहत, पालघर नगरपरीषद यासोबतच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात डहाणू आणि पालघर तालुक्यातील जवळपास १२ हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी देखील दिले जाते. त्याचबरोबर जिल्ह्यातील वांद्री मध्यम प्रकल्प, कुर्झे, मनोर, माहीम-केळवा, देवखोप, रायतळे, खांड, मोहखुर्द, डोमहिरा आणि वाघ या लघू पाटबंधारे योजनांमधून आजूबाजूच्या गावांमधील पाणीपुरवठा योजना आणि शेतीला सिंचनासाठी पाणी सोडले जाते॰

या वर्षी नैऋत्त मान्सूनचे उशीरा आगमन झाल्याने जून महिन्यात फक्त ५५७.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलै महिन्यात पावसाने सर्व कसर भरून काढत तब्बल १५०१.६ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद केली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे काठोकाठ भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांसह सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पावसाअभावी जमीनीला भेगा पडायला लागून भात पिकांसह वरी, नागली सारखी पिके सुकू लागली होती. आणखी आठ-दहा दिवस पावसाने दडी मारली असती तर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -