
नवी दिल्ली: भारतात आयोजित होत असलेल्या जी-२० परिषदेत (g-20 summit) सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्लीत पोहोचले आहेत. जो बायडेन( jo biden) राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत.
एअरपोर्टवर जो बायडेन यांचे जोरदार स्वागत झाले. केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी जो बायजेन यांचे स्वागत केले. यानंतर बायडेन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
पंतप्रधान निवासस्थानी भारत-अमेरिका यांच्यात द्वीपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीत संरक्षण सहयोग, काऊंटर टेररिझ्म, सायबर सुरक्षा सहयोग, व्यापार आणि आर्थिक संबंध, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार, व्यापार आणि गुंतवणूक, उर्जा क्षेत्र, जलवायू परिवर्तन, अंतराळ सहयोग, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य, शिक्षण, सांस्कृतिक सहयोग, इंडो-पॅसिफिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल.
QUAD विस्तारावर होणार चर्चा
भारत आणि अमेरिका इंडो पॅसिफिकमध्ये दोन्ही देशांच्या भागीदारीबाबत चर्चा होऊ शकते. याशिवाय सोबत मिळून QUAD विस्तारावर काम करण्याबाबतही चर्चा होऊ शकते. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणुकीवरही चर्चा होईल. डिफेन्स क्षेत्रात दोन्ही देशांच्या भागीदारीबाबत चर्चा होऊ शकते.
पंतप्रधान मोदी या नेत्यांशी करणार चर्चा
९ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी युके, जपान, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांसोबत द्वीपक्षीय चर्चा करतील. याशिवाय १० सप्टेंबरला पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्रपती मँक्रो यांच्यासोबत लंच मीटिंग करतील. पंतप्रधान मोदी कोमोरोस, तुर्की, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि नायजेरियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक करतील.