Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीJawan Box Office collection: शाहरूखच्या जवानने पहिल्या दिवशी कमावले तब्बल इतके कोटी

Jawan Box Office collection: शाहरूखच्या जवानने पहिल्या दिवशी कमावले तब्बल इतके कोटी

मुंबई: शाहरूख खानचा (shah rukh khan) सिनेमा जवान (jawan) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बंपर कमाईचे संकेत दिले. हा सिनेमा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७०-८० कोटीदरम्यान कमाई करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या मते जवानने पहिल्या दिवशी नॅशनल चेन्सवर साधारण ३० कोटींची कमाई केली. त्यांच्या मते सिनेमाने PVR Inox मध्ये २३.४० कोटी, सिनेपोलिसमध्ये ५.९० कोटींची कमाई केली आहे. हे आकडे रात्रीच्या १०.४५ वाजेपर्यंतचे आहेत. ८.३० वाजेपर्यंत मूव्ही मॅक्समध्ये सिनेमाने ९० लाखांची कमाई केली आहे. या पद्धतीने जवानने पठाण सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे.

७५ कोटींची रेकॉर्ड कमाई

वेबसाईट sacnilkच्या मते सिनेमाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली आहे. हिंदीमध्ये या सिनेमाने ६५ कोटींचा बिझनेस केला तर तामिळ आणि तेलुगु भाषांमध्ये या सिनेमाने ५-५ कोटींची कमाई केली. या पद्धतीने जवान सिनेमाने पठाणचा आणखी एक रेकॉर्ड तोडला.

 

शाहरूखने चाहत्यांना म्हटले धन्यवाद

शाहरूखच्या जवान सिनेमाला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर शाहरूख खानचे काही चाहते त्याच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करताना दिसत आहेत तर काही जण फटाके फोडत आहेत.

या सिनेमात शाहरऊख व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, संजय दत्त, प्रियामणि, सान्या मल्होत्रा असे स्टार्स दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -