करा आपली खरेदी आपल्याच मनाप्रमाणे…...…

  110

सुमिता चितळे:मुंबई ग्राहक पंचायत

वाचून प्रश्न पडला असेल ना की, आपल्याच पैशाने आपली खरेदी आपण करतो मग शीर्षक असे का? कारण कधीकधी ती दुसऱ्याच्या अभिप्रायाप्रमाणे आणि मताप्रमाणेही होऊ शकते. आतापर्यंत ग्राहक खरेदी करायचे ती प्रत्येकाची आवड-निवड, किंमत, दर्जाप्रमाणे तसेच टीव्ही, रेडिओवरच्या जाहिराती बघून - ऐकून आणि छापील जाहिराती वाचून. आताच्या डिजिटल युगात वस्तूंची जाहिरात करण्याचा परिघ विस्तारला आहे. वेगवेगळ्या समाज माध्यमांवर जाहिरात करण्यास पसंती मिळते आहे. हल्ली जवळजवळ प्रत्येक जण समाज माध्यमांवर सक्रिय असतो. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, ब्लॉग या सर्व समाज माध्यमांवर असे इन्फ्लुएन्सर असतात. इन्फ्लुएन्सर म्हणजे अशी प्रभावशाली व्यक्ती की जिच्या एका पोस्टमुळे ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. ग्राहक हे वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी निवडीचा हक्क बजावत असतातच. पण या हक्कांवर कोणी गारुड घालत असेल तर? वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, एखादी वलयांकित व्यक्ती, एखाद्या क्षेत्रात प्रसिद्ध पावलेली व्यक्ती कोणतीही वस्तू किंवा सेवा याबद्दल सांगत असेल, तर ग्राहकांचा त्यावर सहजच विश्वास बसतो. ग्राहकांच्या याच मानसिकतेचा फायदा जाहिरातदार उचलतात.


समाज माध्यमांवरील इन्फ्लुएन्सरकडे विशिष्ट विषयांचा अभ्यास असतोच असे नाही. प्रभावी सादरीकरण करण्याची हातोटी मात्र त्यांच्याकडे असते. असे लोक त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवर त्या विषयावर नियमित पोस्ट करतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे फॉलोअर्स (अनुकरण करणारे लोक) तयार करतात. यांनाच इन्फ्लुएन्सर म्हणतात. उत्पादक मंडळी अशा इन्फ्लुएन्सरचा उपयोग जाहिरातीसाठी किंवा ‘प्रमोशन’साठी करू लागले आहेत. जाहिरातदारांना हे इन्फ्लुएन्सर आवडतात कारण त्यांच्या अनुयायांना ते प्रचारित करणारी उत्पादने खरेदी करण्यास उद्युक्त करतात. प्रथम उत्पादक इन्फ्लुएन्सरची माहिती गोळा करतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या उत्पादनांचे समर्थन करण्याचे काम दिले जाते. यांचे छोटे - मोठे गट केले जातात. लाखो फॉलोअर्स त्यांचा एक गट, हजारो असतील तर दुसरा एक गट वगैरे. त्यांच्या फॉलोअर्सच्या आकड्यांवर इन्फ्लुएन्सरचे मानधन ठरते. यातूनच हे इन्फ्लुएन्सर भरपूर पैसे कमावतात. एका अंदाजानुसार अशा प्रकारच्या समर्थनांसाठी २०२१ मध्ये ९०० करोड रुपये खर्च करण्यात आले होते. २०२५ मध्ये हाच आकडा तब्बल २२०० करोड रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. एका अर्थी हे इन्फ्लुएन्सर वस्तूचे किंवा सेवेचे ‘ब्रँड अम्बॅसॅडर्स’ असतात.


जेव्हा अशा इन्फ्लुएन्सर्सचा फारच बोलबाला होऊ लागला तेव्हा सरकारच्याही लक्षात आले की ही सुद्धा एक प्रकारची जाहिरातबाजीच आहे. त्यामुळे यावरही अंकुश असायलाच हवा. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी (सीसीपीए)मार्फत काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. उदाहरणार्थ कायद्याने या समर्थनाला जाहिरात असेच संबोधण्यात येईल आणि त्यामुळेच जाहिरातविषयक सर्व नियम त्यांना लागू असतील. तसेच ज्या उत्पादनाबद्दल काही म्हणायचे आहे त्याची इन्फ्लुएन्सरने पूर्ण माहिती आधी घ्यावी, आपण जे काही म्हणत आहोत त्याची पूर्ण
जबाबदारी घ्यावी.


जानेवारी २०२३ मध्ये ‘ॲडव्हटाईझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एएससीआय) ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे / सूचना जारी केल्या आहेत. अगर कोणी या सूचना पळत नसेल तर आस्की स्वतःहून त्यावर कार्यवाही करते. उदाहरण द्यायचे झाले तर ब्रिज हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे देता येईल. एका इन्फ्लुएन्सरने या हॉटेलबाबत आपल्या अकाऊंटवर बरीच भलामण केली होती. नियमावलीनुसार ही सर्व माहिती ‘पेड प्रमोशन’ आहे असे त्यांच्या सर्व व्हीडिओमध्ये दाखवणे बंधनकारक होते; परंतु तसे काही त्या पोस्टमध्ये नव्हते. तक्रार जेव्हा चर्चेला आली तेव्हा हॉटेलची बाजू मांडण्यासाठी कोणीही हजर नव्हते. आस्कीने हे मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यामुळे ही तक्रार योग्य आहे असा एकतर्फी निर्णय दिला. अशीच आणखी एक तक्रार विसावा रिसॉर्टबाबतीत आस्कीच्या लक्षात आली होती. त्यावरही असाच निर्णय दिला गेला.


इन्फ्लुएन्सर्सचे अनुकरण करणारे लोक (फॉलोअर्स) मात्र त्याने सांगितलेले विश्वासार्ह आहे की नाही याची शहानिशा न करता त्याचे अनुकरण करतात. ते सांगतात त्या सर्व सोयी- सुविधा तेथे जाणाऱ्यांना खरंच योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत का? हे प्रश्न मनात आणून आपली सहल/भ्रमंती याची योजना आखताना सर्वांनी फक्त या इन्फ्लुएन्सर्सचे अनुकरण न करता स्वतः त्या हॉटेल किंवा रिसॉर्टच्या विशिष्ट साईटवर पाहून आपापल्या आवडीप्रमाणे, गरजेनुसार माहिती मिळवली पाहिजे. म्हणजेच आपण सर्व ग्राहकांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहकांच्या निवडीच्या हक्काबरोबरच चिकित्सा करून निर्णय घेणे हे कर्तव्य बजावले पाहिजे आणि जागरूक राहायला हवे. त्याचप्रमाणे इन्फ्लुएन्सरनी दिलेल्या माहितीचे अंधानुकरण न करता आणि दुसऱ्या कोणाच्याही प्रभावाखाली न येता निर्णय घेतले, तरच आपली खरेदी आणि विकत घेत असलेली सेवा आपल्या हातात राहून ती स्वतःच्या मनाप्रमाणे हवी तशी करता येईल.


mgpshikshan@gmail.com



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने