Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीDevendra Fadnavis : निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष

Devendra Fadnavis : निवडणूक शपथपत्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवडणूक शपथपत्रात (Election affidavit) गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. ॲड. सतीश उके (Adv. Satish Uke) यांनी हा आरोप करत नागपूरच्या प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात (Nagpur court) याचिका दाखल केली होती. यात त्यांनी फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. आज यावर सुनावणी करत न्यायालयाने फडणवीसांना मोठा दिलासा आहे. ठोस पुराव्यांअभावी निकाल फडणवीसांच्या बाजूने लागला आहे. वरिष्ठ विधीज्ञ सुबोध धर्माधिकारी यांनी फडणवीसांची बाजू कोर्टात मांडली.

२०१४ मधील विधानसभा निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावरील दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप ॲड. सतीश उके यांनी केला होता. तर, नजरचुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले. या गुन्ह्यांविषयी माहिती न देण्याचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. तसेच प्रत्येक निवडणूकीला मला मिळणाऱ्या मतदानाची संख्या वाढतच आहे, असा युक्तीवाद फडणवीसांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.

दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने यावरचा निर्णय ५ सप्टेंबरपर्यंत रोखून ठेवला होता. त्यानंतर हा निर्णय ८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला व आज कोर्टाने आपला निर्णय जाहीर केला. ठोस पुराव्यांअभावी न्यायालयाने फडणवीसांची निर्दोष मुक्तता केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाचे होते. ते गुन्हे लपवले तरी त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याने फडणवीसांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -