एके ठिकाणी नामदेव महाराजांनी किती सुंदर म्हटले आहे बघा, “आपुलीच आवडी धरोनी खेळीया आप आपणांते व्याला रे” तो आपल्याच ठिकाणी असणारी आवड म्हणजे आनंद घेऊन व्याला. आवड हे आनंदाचे रूप आहे, हे लक्षात ठेवायचे म्हणून जगात प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी आवड असते. या आवडीचे महत्त्व इतके आहे की, त्याची आवड लक्षात घेऊन जर माणसाला develop केले, तर तो जगात मोठा होऊ शकतो.
एखाद्या मुलाला इंजिनीअर होण्याची आवड आहे व बाप आहे वकील आणि बापाच्या इच्छेप्रमाणे तो वकील होण्याचा प्रयत्न करू लागला, तर तो तिथेच अपयशी होणार व आवड इंजिनीअरिंगची म्हणून इंजिनीअरिंगला गेला, तर यशस्वी होणार. मुलाला काय आवडते ते पाहून develop केले पाहिजे. आपली आवड त्याच्यावर लादता कामा नये. आजकाल काय झालेले आहे, आई-वडील ठरवतात मुलांनी काय करायचे ते. कुठे जायचे हे आई-वडील ठरवतात. आई-वडिलांपेक्षाही मित्रमैत्रिणी ठरवतात. पूर्वीच्या काळी आई-वडील ठरवत होते, आता मित्रमैत्रिणी ठरवतात. आई-वडिलांपेक्षा मित्रमैत्रिणी काय सांगतात, यावर मुलांचा जास्त विश्वास असतो. अशाने होते काय? आवड असते एक व आपण गेलो दुसरीकडे, तर आपण कधीच success होऊ शकत नाही. मुलांवर कुठलीही जबरदस्ती करू नये. त्याच्या आवडीप्रमाणे त्याने मार्ग अवलंबिला, तर तो जीवनात success होऊ शकतो.
सांगायचा मुद्दा, आवड हे आनंदाचे रूप आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला कशाची न कशाची आवड असतेच, कारण प्रत्येकाच्या ठिकाणी आनंद आहे ज्याला आपण स्वानंद म्हणतो. आनंद व स्वानंद यांत फरक आहे. हा स्वानंदाच आनंदावर येतो. हा आनंद आपण दुसऱ्याला देतो, तेव्हा होते ते सुख. ते सुख आपल्याकडे परिवर्तीत होते तेव्हा आपल्याला होते ते समाधान. लक्षात आले की नाही. आम्ही काय सांगतो, “आनंद वाटा आनंद लुटा.” प्रथम आनंद वाटायला शिका म्हणजे आनंद लुटता येईल. लोकांना असे वाटते की, आमच्याकडे आनंदच नाही, तर आम्ही आनंद वाटणार काय व लुटणार काय?
जीवनविद्या सांगते तुमच्याकडे आनंदाचा सागर आहे. तुम्ही आनंदाचा समुद्र आहात व तो कधीही आटत नाही. समुद्र कधी आटला आहे का? समुद्र कधीही आटत नाही, तो कधीही विटत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. हा आनंद आपल्या ठिकाणी आहेच. तुम्ही जेव्हा आनंद द्यायला लागता, तेव्हा आनंद बाहेर यायला लागतो. देण्याची क्रिया महत्त्वाची आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…