Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीJawan: 'जवान'ने आणलेय वादळ, थिएटर्समध्ये नाचले शाहरूखचे चाहते

Jawan: ‘जवान’ने आणलेय वादळ, थिएटर्समध्ये नाचले शाहरूखचे चाहते

मुंबई: प्रतीक्षा संपली…शाहरूचा बहुप्रतिक्षित सिनेमा जवान अखेर थिएटर्समध्ये रिलीज झाल आहे. पठान सिनेमानंतर किंग खान जवान बनून बॉक्स ऑफिसवर वादळ आणण्यासाठी तयार आहे. २०२३च्या सुरूवातील पठानने जी कमाई केली होती त्याचा रेकॉर्ड अद्याप तुटलेला नाही. वर्ष संपण्याआधी शाहरूखने जवानच्या रूपात चाहत्यांना आणखी एक गिफ्ट दिले आहे. ज्या पद्धतीने बुकिंगचे आकडे दिसत आहे ते पाहता जवान सिनेमावरही कोट्यावधींचा पाऊस पडू शकतो.

जवानने आणलेय वादळ

अॅक्शन थ्रिलर सिनेमा जवान दक्षिणेचे दिग्दर्शनक एटली यांनी बनवला आहे. शाहरूखचा या सिनेमात डबल रोल आहे. त्याशिवाय सिनेमात नयनतारा, विजय सेतुपथी, प्रियामणी, सान्य मल्होत्रा, रिद्धी डोगरा, लहर खान, एजाज खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य यांच्या मुख्य भूमिका आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण या सिनेमात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. ३०० कोटींच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनला आहे.

थिएटर्सबाहेर जवानचे सेलिब्रेशन

शाहरूख खानचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहते अतिशय उत्सुक होते. सिनेमाहॉलच्या बाहेर लोकांनी भरपूर गर्दी केली होती. मुंबईच्या प्रसिद्ध Gaiety Galaxy च्या बाहेर सकाळी ६ वाजता लोकांनी सेलिब्रेशन केले. ढोल वाजवले, डान्स केला तसेच जवान सिनेमाचे जोरदार स्वागत केले.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -