
मुंबई: भारत पहिल्यांदा पूर्णपणे एकहाती वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून होत आहे. तर या स्पर्धेचा फायनला सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे जी क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबरपेक्षा कमी नाही. या स्पर्धेत टीम इंडिया ९ विविध शहरांमध्ये आपल्या ग्रुप स्टेजमधील ९ सामने खेळणार आहे.
वर्ल्डकपआधी बीसीसीआयची ही मोठी घोषणा
वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटांची वाढती मागणी पाहता भारतीय क्रिकेट बोर्डाने या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठीच्या पुढील फेजसाठी तब्बल चार लाख तिकीटे जारी करणार आहे. बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की या चार लाख तिकीटांमध्ये भारताच्या सामन्यांचे किती टक्के तिकीटे असतील. अधिकाधिक चाहत्यांना तिकीटे मिळावीत असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
🚨 NEWS 🚨 BCCI set to release 400,000 tickets in the next phase of ticket sales for ICC Men's Cricket World Cup 2023. #CWC23 More Details 🔽https://t.co/lP0UUrRtMz pic.twitter.com/tWjrgJU51d
— BCCI (@BCCI) September 6, 2023
बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, जगभरातील क्रिकेट प्रेमी आता या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपली जागा पक्की करू शकतात. यानुसार ८ सप्टेंबर २०२३ला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून तिकीटांची विक्री सुरू होईल. क्रिकेट चाहते अधिकृत वेबसाईट https://tickets.cricketworldcup.com.वर जाऊन तिकीट खरेदी करू शकतात.
वर्ल्डकप २०२३मध्ये टीम इंडियाचे सामने
टीम इंडिया वर्ल्डकप २०२३मध्ये आपल्या अभियानाची सुरूवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कऱणार आहे. दोन्ही संघादरम्यान हा सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये खेळवला जाईल. टीम इंडिया येथे दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ११ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये खेळेल. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला रंगणार आहे. १९ ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. टीम इंडिया आपला पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध २२ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरला लखनऊनमध्ये भारत वि इंग्लंड सामना रंगेल. श्रीलंकेविरुद्ध भारत २ नोव्हेंबरला खेळणार आहे. त्यानंतर कोलकातामध्ये ५ नोव्हेंबरला द. आफ्रिकेविरुद्ध भारत खेळणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये आपला शेवटचा सामना १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.