Australia Moon mission : भारताकडून प्रेरणा घेत आता ऑस्ट्रेलियाही जाणार चंद्रावर

Share

रोव्हरचं नाव ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियात अनोखी स्पर्धा

कॅनबेरा : भारताने आपली महत्त्वाकांक्षी अशी चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिम यशस्वी केली आणि अख्ख्या जगासमोर एक आदर्श घालून ठेवला. या मोहिमेपासून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे, तर आता ऑस्ट्रेलिया देखील चांद्रमोहिमेच्या (Australia Moon mission) तयारीत आहे. ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) नासाच्या (NASA) सहकार्याने, चंद्र ते मंगळ या उपक्रमाच्या ट्रेलब्लेझर कार्यक्रमांतर्गत रोव्हर विकसित करत आहे. सर्व काही योजनेनुसार झाले तर ऑस्ट्रेलिया आतापासून काही वर्षांनी प्रथमच चंद्रावर रोव्हर पाठवणार आहे.

ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हे राष्ट्र नासाच्या आर्टेमिस चंद्र मोहिमेपैकी एकावर रोबोटिक रोव्हर ठेवेल, ज्याची प्रक्षेपण तारीख २०२६ च्या सुरुवातीला आहे. नासाच्या भावी आर्टेमिस मोहिमेचा एक भाग म्हणून रोव्हर त्याच्या चंद्राच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. चंद्रावर उतरणारे हे ऑस्ट्रेलियाचे पहिलेच रोव्हर असल्याने त्यांच्या अंतराळ विभागासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

ऑस्ट्रेलिया आपल्या रोवरचं डिझाईन तसेच निर्मितीही स्वतः करणार आहे. ऑस्ट्रेलिया संपूर्ण जगामध्ये आपल्या रिमोट कम्युनिकेशन सिस्टीमसाठी ओळखला जातो. त्यामुळे ते रोवरपासून थेट संपर्क करण्याचाही प्रयत्न करेल. या रोवरला इलॉन मस्कची कंपनी स्पेस एक्सच्या स्टारशीपच्या मदतीने किंवा फॉल्कन हेवी रॉकेटच्या साहाय्याने चंद्रावर पाठवलं जाईल. मातीचं सॅम्पल घेतल्यानंतर नासा त्या नमुन्यातून ऑक्सिजन काढण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून भविष्यात चंद्रावर जेव्हा माणूस जाईल तेव्हा तो मातीपासून ऑक्सिजन मिळवू शकेल. चंद्रावर शाश्वत मानवी उपस्थितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

रोव्हरचं नाव ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियात स्पर्धा

ऑस्ट्रेलियाने अजून आपल्या रोवरचं नाव ठेवलेलं नाही. पण त्यांनी लोकांना या रोवरचं नाव ठेवण्यास सांगितलं आहे. त्यांनी ट्विट करून नावं मागवली आहेत. फक्त अट इतकीच की तुम्ही ऑस्ट्रेलियाचे नागरीक असावं. यासाठीची स्पर्धाही सुरू झाली आहे. नाव सुचवण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ ही असून ६ डिसेंबर २०२३ रोजी निवडलेल्या नावाची घोषणा केली जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

10 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

33 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

1 hour ago