जकार्ता : एकवीसावे शतक हे आशियाचे शतक आहे; एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी इंडोनेशियातील जकार्ता येथे विसाव्या आसियान शिखर परिषदेमध्ये (ASEAN-India Summit) केले. पीएम मोदींसोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही आसियान शिखर परिषदेला उपस्थित होते.
शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडोनेशिया आणि आमची (भारत) भागीदारी चौथ्या दशकात पोहोचली आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे अभिनंदन करतो. गेल्या वर्षी आम्ही भारत-आसियान मैत्री दिन साजरा केला होता. आता त्याचे रूपांतर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत झाले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ही परिषद आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपला इतिहास आणि भूगोल भारत आणि आसियानला एकत्र करतो. यासोबतच सामायिक मूल्ये, प्रादेशिक एकात्मता आणि शांतता, समृद्धी आणि बहु-ध्रुवीय यावर आमचा सामायिक विश्वास आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसियान-भारत शिखर परिषदेला हजरी लावली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी जकार्तामध्ये दाखल झाले. यावेळी इंडोनेशियन महिला सशक्तिकरण आणि बाल संरक्षण मंत्री आई गुस्ती आयु बिंटांग दारमावती यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी इंडोनेशियाचे सांस्कृतिक नृत्यही सादर करण्यात आले. यावेळी जमलेल्या भारतीयांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीयांना अभिवादन करत त्यांच्यासोबत संवाद साधला.
दरम्यान, नवी दिल्लीत जी-२० चे आयोजन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी दिल्लीला परतणार आहेत.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…