
नवी दिल्ली: भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल १ (aditya l1) आपल्या ध्येयाच्या दिशेने जात आहे. यातच आदित्य एल१ ने प्रवासादरम्यान पृथ्वी आणि चंद्राचा सेल्फी तसेच फोटो घेतला आहे. याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.
याआझी आदित्य एल १ने मंगळवारी पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली होती. इस्त्रोने सांगितले होते की पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित दुसरी प्रक्रिया आयएसटीआरएसी, बंगळुरू येथून यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमध्ये आयएसटीआरएसी/इस्त्रोने केंद्रांच्या या अभियानादरम्यान उपग्रहावर लक्ष दिले. प्राप्त करण्यात आलेली नवी कक्षा २८२ किमी x४०२२५ किमी इतकी आहे. इस्त्रोच्या मते आदित्य एल १ पृथ्वी च्या कक्षेशी संबंधित तिसरी प्रक्रिया १० सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता निर्धारित करण्यात आली.
Aditya-L1 Mission: 👀Onlooker!
Aditya-L1, destined for the Sun-Earth L1 point, takes a selfie and images of the Earth and the Moon.#AdityaL1 pic.twitter.com/54KxrfYSwy — ISRO (@isro) September 7, 2023
२ सप्टेंबरला लाँच झाली होती मोहीम
इस्त्रोने श्रीहरिकोटा येथून २ सप्टेंबरला ही सूर्य मोहीम लाँच केले होते. आदित्य एल १ला सूर्य पृथ्वीदरमयान एल १ पॉईंटवर स्थापित केले जाणार आहे आणि लाँच झाल्यानंतर याला पोहोचण्यास १२५ दिवस लागतील. यानंतर आदित्य एल १ सूर्यावर रिसर्च करू शकणार आहेत. चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरल्यावर मोठा रिसर्च केला जाणार आहे. यासोबतच इस्त्रो आपले अनेक मिशन लाँच करणार आहे. यात शुक्र तसेच गगनयान मोहीम पाईपलाईनमध्ये आहे. अंतराळात शुक्र असा एक ग्रह आहे ज्याबाबात म्हटले जाते की हा ग्रह पृथ्वीप्रमाणेच आहे. येथे माणूस राहू शकतो.