Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीJan Aashirwad Yatra : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर दगडफेक

Jan Aashirwad Yatra : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर दगडफेक

नीमच: मध्य प्रदेशात (madhya pradesh) विधानसभा निवडणुकीआधी काढल्या जात असलेल्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर (jan ashirvad yatra) दगडफेक करण्यात आली. नीमचच्या मनासा येथे ही दगडफेकीची घटना घडली. ज्यावेळेस ही दगडफेक करण्यात आली त्यावेळी भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय आणि मंत्री मोहन यादव या रथावर होते.

दगडफेकीत अनेक गाडींचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष वी डी शर्मा म्हणाले, की अशा घटनांनी आम्ही घाबरणार नाही. भाजपने मध्य प्रदेशात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. नीमचमधील या आशीर्वाद यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आली. यात रथासह पोलिसांच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर रथामध्ये भाजपचे नेते कैलाश विजय वर्गीय आणि मंत्री मोहन यादव उपस्थित होते.

आज ही यात्रा मनासा विधानसभेच्या रावडी कूवि गावांत पोहोचली तेव्हा तेथील ग्रामीण लोकांनी यावेळेस दगडफेक केली. चीता प्रोजेक्टमध्ये वन विभागाकडून भूमी अधिग्रहण केल्याने हे ग्रामस्थ चिडले होते. त्यावेळेस त्यांनी या रथयात्रेवर दगडफेक केली. यात अर्धा डझनहून अधिक गाड्यांचे नुकसान झालेय.

सोमवारी सुरू झाली होती यात्रा

उज्जैन संभागची जन आशीर्वाद यात्रेची सुरुवाती सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नीमचमध्ये हिरवा झेंडा दाखवत केली होती.

आम्ही घाबरणार नाही

घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले आमच्या यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आम्ही घाबरणार नाही. गरज पडल्यास पायी यात्रा करू.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -