Monday, May 12, 2025

मनोरंजननाशिक

स्टॅम्प घोटाळा वेब सिरीजने तेलगी, नोट प्रेस व "त्या" नेत्याचा तथाकथित सहभाग तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत!

स्टॅम्प घोटाळा वेब सिरीजने तेलगी, नोट प्रेस व

प्रमोद दंडगव्हाळ


सिडको : तब्बल वीस वर्षापुर्वी तीस हजार कोटींचा स्टॅम्प घोटाळा करणारा अब्दुल करीम तेलगी याच्या जीवनावर आधारीत वेब सिरीज ही सोनी लिव्ह वर शुक्रवारी प्रसारित करण्यात आली. या वेब सिरीजचा केंद्रबिंदू असलेली नाशिक नोट प्रेस व "त्या" नेत्याचा तथाकथित सहभाग पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. यामुळे नाशिकचे नाव संपूर्ण देशभरातील कानाकोपऱ्यात या वेब सिरीजमुळे एकप्रकारे बदनाम झाल्याचे दिसून येत आहे.


'तेलगी स्कॅम २००३' ही एकूण दहा एपिसोड्सची वेब सिरीज आहे. त्यापैकी आता फक्त पाच एपिसोड्स प्रदर्शित झाले असून इतर १५ भाग नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. मात्र पहिले पाच एपिसोड्स पाहिल्यानंतर हे लक्षात येत की, ही अशा सिरीजपैकी एक आहे, ज्याला आवर्जून पाहिलं पाहिजे. एक गरीब व्यक्ती संपूर्ण देशाला तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा चुना लावतो. त्याची कथा जाणून घेण्यासाठी कुणीही उत्सुक होईल.


पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेलगीची नार्को टेस्ट होते. हा सीनच तुम्हाला पुढील एपिसोड पाहण्यासाठी आतूर करेल. स्कॅम २००३ या सिरीजचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला. तेव्हा प्रत्येकाच्या मनात हाच सवाल होता की, हंसल मेहता या घोटाळ्याच्या किती खोलवर जाऊ शकतील. मात्र सिरीजने या प्रश्नांची उत्तरं स्पष्टपणे दिली आहेत. हंसल मेहता हे कथेबाबत संपूर्ण संशोधन करून त्याची प्रत्येक बाजू दाखवतात. हेच या सिरीजबद्दलही पाहायला मिळतं. यामध्ये प्रत्येक मुद्दा खोलवर जाऊन दाखवण्यात आला आहे. या सिरीजचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केलं आहे. त्यांनी प्रत्येक भूमिकेवर बारकाईने मेहनत घेतली आहे.


अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेतील गगन देव रियार तुम्हाला थक्क करतो. या भूमिकेला त्याने पूर्ण न्याय दिला आहे. तेलगीच्या व्यक्तिरेखेला त्यांनी हुबेहूब कॉपी केलं आहे. असे असूनही ते अभिनय करत आहेत, असा भास कधीच होत नाही. तेलगीच्या भूमिकेतील प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने आपल्या अभिनयातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment