
नवी दिल्ली :जगातील १८ देशांची गुरूवारी इंडोनेशियामध्ये(indonesia) आसियान आणि पूर्व आशिया परिषद भरवली जात आहे. या दोन्ही जागतिक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. मात्र सगळ्यात मोठी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी आपला प्लान बदलला आहे.
या देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. संमेलनाची सुरूवात याआधी साडेआठ वाजता होणार होती मात्र ती एक तास आधी करण्यात आली आहे. आता याची सुरूवात ७.३० वाजता होणार आहे आणि हे सगळं केलं पंतप्रधान मोदींसाठी.
याचप्रमाणे ७ सप्टेंबरला ईस्ट एशिया संमेलनही होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहभागी व्हायचे आहे. मात्र आधी या संमेलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र आता ही वेळ बदलून दीड तास आधी करण्यात आली आहे. हा बदलही पंतप्रधान मोदींसाठीच करण्यात आला आहे.
का केला बदल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जगातील १८ देशांनी आपल्या प्लानमध्ये बदल केला आहे. भारतात जी-२० परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. पंतप्रधान मोदींना भारत-आसियान परिषद आणि पूर्व आशिया संमेलनात सहभागी झाल्यानंतर गुरूवारीच दिल्लीला परतायचे आहे. पंतप्रधान मोदींचा हा व्यस्त कार्यक्रम पाहता १८ देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. ज्यामुळे पंतप्रधान मोदींना दोन्ही संमेलनात सहभागी होता येईल.