आमदार नितेश राणे यांचा शरद पवारांना सवाल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जातीवरुन लक्ष्य केले आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री कसे केले? असा रोखठोक सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जात आहे. यावर ते म्हणाले, जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे जातीय राजकारण सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जे मराठा नसल्याने टीका केली जात आहे. मात्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री असताना मराठ्यांना टीकणारे आरक्षण दिले होते.
तसेच मला शरद पवारांना प्रश्न विचारायचा आहे. की, फडणवीसांच्या फक्त जातीवर राग आहे की, त्यांच्यावर राग आहे. मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंची निवड कशी काय केली? ज्या ठाकरेंनी त्यांच्या मुखपत्रामध्ये मराठ्यांच्या आंदोलनाला मुका मोर्चा म्हटले आहे. त्यांना मुख्यमंत्री का केले?
पुढे राणे म्हणाले की, मराठ्यांच्या वंशजांना पुरावे मागणारे उद्धव ठाकरे चालतात मग फडणवीसांवर का वैयक्तिक आणि जातीय टीका केली जाते? याचे उत्तर मराठा समाजाला हवे आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास काम केली. म्हणून त्यांच्यावर वैयक्तिक आणि जातीय टीका केली जात आहे. हे षडयंत्र लवकर थांबवावे, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra