मुंबई: मराठी सिनेमा तसेच नाट्यसृ्ष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (prashant damle) यांना मातृशोक झाला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले (vijaya damle) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आईच्या जाण्याने प्रशांत दामले यांच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
आईचं निधन झाले तेव्हा प्रशांत दामले कामानिमित्त बाहेर होते. आईच्या निधनाचं वृत्त समजताच प्रशांत दामले तातडीने मुंबईला निघून आले. प्रशांत दामले यांच्या आईच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
View this post on Instagram
मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांमध्ये प्रशांत दामले हे मोठे नाव आहे. त्यांनी अनेक सुपरहिट नाटके, चित्रपट तसेच मालिका केल्या आहेत. अनेक रिअॅलिटी शोजही केलेत.
मराठी नाट्यक्षेत्रात प्रशांत दामले हे अतिशय प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्डही आहेत. त्यांनी रंगभूमीवर नाटकांचे रेकॉर्डब्रेक प्रयोगही केले आहेत.