
भाजप आमदार नितेश राणे यांना भावनिक सल्ला आणि सवाल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मी त्यांना आवाहन करतो की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्बेतीची काळजी समाजबांधव म्हणून आम्हाला आहे. सरकार मागण्यांची दखल घेत आहे. सरकार विश्वास देत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचा वापर करू देऊ नका, तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, स्वतःची काळजी घ्या, अशी विनंती भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जरांगे यांना केली आहे.
आज सकाळी तब्येत खालावली हे कळाले. मी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी आणि जवळच्या सहका-यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली होती. ते ३६ किलोचे आहेत. त्यांना किडनीचा त्रास आहे. अशा परिस्थितीत जेवले नाही, पाणी घेतले नाही तर चिंताजनक आहे. मला त्यांच्या नातेवाईकांनी आवाहन केले होते, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.
मी पुन्हा एकदा आवाहन करतो, तुमची काळजी आहे, तुमचा मुद्दा सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. दोनवेळा गिरीश भाऊ येऊन गेले आहेत. काल रात्री मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री भेटले आहेत. चर्चा केली आहे. आज मंत्रीमंडळ बैठक आहे. तुम्ही स्वतःचा वापर करू देऊ नका, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, याठिकाणी जातीचे राजकारण सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केली जात आहे. मराठा नाही म्हणून ते अन्याय करत आहेत, असे कँपेन चालवले जात आहे. माझा जुना व्हिडिओ फिरवला जात आहे. मी मान्य करतो. पण मुख्यमंत्री असताना टिकणारे आरक्षण देत त्यांनी आमचे तोंड गप्प केले.
शरद पवार यांच्यासमोर मी लहान असलो तरीही प्रश्न विचारतो. मराठा नसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चालले. जातीचा प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे हे मराठा नाहीत, ते तुम्हांला चालतात. त्यांच्या मुखपत्रात मुका मोर्चा बोलतात. आमच्या वंशजांचा पुरावा मागितला जातो, ते कसे चालतात?
मग आमच्या फडणवीस यांबाबत का जातीचे राजकारण करत आहात, याचे उत्तर समाजाला हवे आहे. याबाबत लवकर उत्तर द्या, नाहीतर फडणवीस यांच्याबाबत जे घाणेरडे राजकारण सुरु आहे ते थांबवा. फडणवीस यांनी भ्रष्टाचार थांबवला, खूप लोकांना कामाला लावले, त्यांच्याविषयी जो राग आहे, त्यातून ही वैयक्तिक टीका केली जात आहे, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
लवकरच खिचडी चोर प्रकरणी जेलवारी करतील, मग खरा फ्रॉड कोण हे संजय राऊत यांना कळेल
वन नेशन वन इलेक्शन हे फ्रॉड आहे हे बोलणारा कोण, खिचडी चोर! संजय राजाराम राऊत जेव्हा जालनाला उपोषण स्थळी गेला त्यावेळी तेथील लोकांनी ठणकावले, याला बोलून देऊ नका. ही याची लायकी. संजय राऊतच्या कुटुंबातील लोक लवकरच खिचडी चोर प्रकरणी जेलवारी करतील, मग खरा फ्रॉड कोण हे संजय राऊत यांना कळेल
उद्धव ठाकरे यांची राक्षसीवृत्ती
दुसऱ्यांच्या घरातील बारसे व लग्नाबाबत चिंता असते. हरिश साळवे यांनी सांगून लग्न केले. तुमच्यासारखं डॉक्टरांना स्वप्न दाखवले नाही. देशाला मोदींवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांची राक्षसीवृत्ती नेहमीच आहे. शिवसेनेतील अनेक मराठा नेत्यांना त्यांनी संपवलं आहे. आता ते मराठा आरक्षणाबाबत बोलत आहेत.