Monday, July 22, 2024
Homeक्रीडाAsia cup 2023: आशिया कपमधील सुपर ४चे सामने, पाहा कुठे, कधी रंगणार...

Asia cup 2023: आशिया कपमधील सुपर ४चे सामने, पाहा कुठे, कधी रंगणार सामने

मुंबई: आशिया चषकाचे (asia cup 2023) सुपर ४मधील चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंततर सुपर ४ मध्ये कोणते संघ एकमेकांशी भिडणार हे समोर आले आहे. तसेच टीम इंडियाचे वेळापत्रकही समोर आले आहे. टाकूया यावर एक नजर

लाहोरमध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला अवघ्या २ धावांनी पराभव सहन करावा लागला आणि श्रीलंकेला सुपर ४चे तिकीट मिळाले.

या संघांशी भिडणार टीम इंडिया

आशिया चषकमधील सुपर ४चे सामने आता अधिकच रोमांचक होणार आहेत. खासकरून टीम इंडियाला सुपर ४मध्ये चांगलीच टक्कर मिळणार आहे. सुपर ४मध्ये येत्या १० सप्टेंबला भारत आपला सुपर ४मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ १२ सप्टेंबरला आपला दुसरा सामना खेळणार आहे. हा सामना श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे.

त्यानंतर भारत आपला तिसरा सामना १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. यानंतर जर टीम इंडिया या सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत असेल आणि सामने जिंकत असेल तर ते सरळ १७ सप्टेंबरला फायनल खेळतील. हे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील.

सुपर ४चे वेळापत्रक

६ सप्टेंबर पाकिस्तान वि बांगलादेश
९ सप्टेंबर श्रीलंका वि बांगलादेश
१० सप्टेंबर भारत वि पाकिस्तान
१२ सप्टेंबर भारत वि श्रीलंका
१४ सप्टेंबर पाकिस्तान वि श्रीलंका
१५ सप्टेंबर भारत वि बांगलादेश
१७ सप्टेंबर – फायनल

हे सर्व सामने दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -