Monday, February 17, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेDahihandi : दहीहंडी सुद्धा हायजॅक!

Dahihandi : दहीहंडी सुद्धा हायजॅक!

ठाकरे गटाला तडजोड आणि त्याग करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

मुंबई/ठाणे : कल्याणमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यासाठी शिंदे गटाने आधीच सर्व परवानग्या मिळवल्याने झोपेतून जागे झालेल्या ठाकरे गटाला तडजोड आणि त्याग करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यंदाची दहीहंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचीच होणार. शिंदे गटाला पोलिसांनी आधीच परवानगी दिली असल्याने आणि आता त्यात बदल करणे कठीण असल्याने उद्धव ठाकरे गटाला गुरुदेव हॉटेल आणि कुबा रेस्टॉरंट यामधील जागेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आधी एनओसीसाठी आधी अर्ज केला आणि त्याप्रमाणे त्यांना दिली. आता त्याच जागेवर ठाकरे गटाला एनओसी देऊ शकणार नाही. त्यामुळे त्या गटाने जवळच्या अन्य एखाद्या जागेवर आयोजन करावे, असे म्हणणे महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी यांच्यातर्फे राज्य सरकारने न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर मांडले.

त्यामुळे आता ऐनवेळी पोलिसांना आधीच्या निर्णयात बदल करणे कठीण आहे, त्यामुळे तुम्ही यंदाच्या वर्षी तडजोड करा आणि त्याग करा, असे खंडपीठाने ठाकरे गटाला सुचवले. त्यानंतर ठाकरे गटाचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख सचिन बासरे यांनी गुरुदेव हॉटेल आणि कुबा रेस्टॉरंट यामधील जागेत आयोजन करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार खंडपीठाने आदेश काढला.

पोलिसांनी त्या जागेसाठी आयोजक बासरे यांना तात्काळ एनओसी द्यावी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, तसेच पोलिसांनी आयोजनाच्या बाबतीत पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -