Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीBharat: 'इंडिया' ऐवजी 'भारत' ला मुख्यमंत्र्यांनी दर्शवला पाठिंबा, केले ट्वीट

Bharat: ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ ला मुख्यमंत्र्यांनी दर्शवला पाठिंबा, केले ट्वीट

मुंबई: नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रात इंडिया (india) ऐवजी भारत (bharat) या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून देशात वातावरण चांगलेच तापले आहे.

जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्र समोर आल्यानंतर यावरून केवळ सवाल उपस्थित केले जात नाही आहेत तर भारत वि इंडिया असे महाभारत सुरू झाले आहे. भारत वि इंडियावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. एकीकडे काँग्रेसने आरोप केला आहे की सरकार इंडिया शब्द हटवत आहे. तर भाजपाकडून यासाठी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारने इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतल्यास त्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो असे त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे.

देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is ‘Bharat’ असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘भारतमाता की जय’ हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती.

साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो… असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला ‘भारत’ या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.

भारतमाता की जय!

 

भाजपचे अनेक मंत्री केंद्र सरकारने उचललेल्या या पावलाबद्दल कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते मात्र यावरून जोरदार टीका करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -