Monday, October 27, 2025
Happy Diwali

Corona: अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, दोन दिवसांनी येणार होत्या भारतात

Corona: अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, दोन दिवसांनी येणार होत्या भारतात

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन (jill biden) दोन दिवसांनी भारतात जी-२० परिषदेत सामील होणार होते. याआधी दोघांचा कोरोना (corona) रिपोर्ट आला आहे. यात फर्स्ट लेडी जिल बायडेन या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, फर्स्ट लेडी ऑफिसचे म्हणणे आहे की त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. यात डेलावेअर स्थित आपल्या घरीच राहतील. व्हाईट हाऊसमधील जवळच्या लोकांनी याची माहिती दिली आहे.

७१ वर्षीय जिल बायडेन पहिल्यांदा १६ ऑगस्टला दक्षिण कॅरोलिनामध्ये राष्ट्राध्यक्षांसोबत सुट्टीदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्या ५ दिवस क्वारंटाईन होत्या.

७ सप्टेंबरला भारतात येणार होत्या फर्स्ट लेडी

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी ७ सप्टेंबरला भारत दौऱ्यावर येणाऱ होत्या. व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष बायडेन ८ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींसह द्विपक्षीय चर्चा करतील. याशिवाय ९ आणि १० सप्टेंबरला जी-२० परिषदेत भाग घेतील. तिथे ते अन्य देशांसोबत क्लीन उर्जा आणि जलवायू परिवर्तन सारख्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील.

Comments
Add Comment