डोंबिवली : गणपती बाप्पांचे आगमन केवळ काहीच दिवसांवर आले आहे. गणपतीच्या पहिल्या दिवशी गुरुजींच्या उपस्थितीत साग्रसंगीत पुजा केली जाते. मात्र अनेकदा गुरूजींच्या अनुपस्थितीमुळे अथवा त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांची गैरसोय होते. हीच गैरसोय लक्षात घेता डोंबिवलीतील “ऑल इन वन गुरुजी’ या संस्थेने नामी शक्कल लढवली आहे.
गुरूजींच्या अनुपस्थितीत स्वत:च घरच्या गणपतीची पुजा कशी करावी याची माहिती या संस्थेने दिली आहे. त्यासाठ १९ सप्टेंबरला ऑल इन वन गुरूजी या यूट्यूब चॅनेलवर गुरूजी पाच वेळा लाईव्ह येत संपूर्ण पुजेची विधी तसेच आरती मराठी आणि हिंदी भाषेत समजावून सांगणार आहेत. तसेच गणेशभक्तांकडून ऑनलाईन पद्धतीने पुजाही करून घेणार आहेत.
गुरुजी सचिन कुलकर्णी आणि आयटी तज्ञ सागर धारगळकर यांनी ही नवी संकल्पना आणली. त्यांच्या या यूट्यूब चॅनेलवर पहाटे ४ वाजता, ६ वाजता, ८ वाजता, १० वाजता आणि दुपारी १२ वाजता ही पुजा सांगितली ाणार आहे.
या ऑल इन वन गुरूजी वेबसाईट तसेच अॅपचे उद्घाटन १ सप्टेंबरला करण्यात आले. या अॅपमध्ये १०० पेक्षा जास्त विविध भाषिक गुरूजींचा समावेश आहे.