काय आहे ही बीसीसीआयची भेट?
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सध्या वर्ल्ड कपचे (World Cup 2023) वारे वाहायला सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे ८ ऑक्टोबरला होणार आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीला हा सामना प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा असते, परंतु तिकीट महाग असते. क्रिकेटप्रेमी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मात्र अगदी एकही रुपया खर्च न करता हे सामने पाहता येणार आहेत. याचं कारण म्हणजे बीसीसीआयच्या (BCCI)वतीने बोर्डाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना स्पर्धेसाठी गोल्डन तिकीटाच्या रूपात एक खास भेट दिली आहे.
गोल्डन तिकीट हे एक असं तिकीट आहे, ज्यामुळे बिग बींना भारतातील कोणत्याही स्टेडियममध्ये सामना पाहता येऊ शकतो आणि त्यांना प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थान देखील मिळेल. जय शाह यांनी आज अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि त्यांना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे गोल्डन तिकीट दिले. हे तिकीट देतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बीसीसीआयने फोटो शेअर करताना म्हटले, “आमच्या गोल्डन आयकॉन्ससाठी गोल्डन तिकिट. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आज सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकिट देण्याचा बहुमान मिळाला. एक दिग्गज अभिनेता आणि क्रिकेटचे कट्टर चाहते. श्री. अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियाला असलेला सततचा पाठिंबा आम्हा सर्वांना प्रेरणा देतो. २०२३ च्या विश्वचषकासाठी त्यांना आमच्यासोबत सामील करून घेताना आम्ही उत्सुक आहोत.”
Golden ticket for our golden icons!
BCCI Honorary Secretary @JayShah had the privilege of presenting our golden ticket to none other than the “Superstar of the Millennium,” Shri @SrBachchan.
A legendary actor and a devoted cricket enthusiast, Shri Bachchan’s unwavering support… pic.twitter.com/CKqKTsQG2F
— BCCI (@BCCI) September 5, 2023
आता एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे, याआधी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाची धुरा रोहित शर्माकडे आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. ४ अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजांसह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra